नमस्कार रामकृष्ण हॉस्पिटल येथे आपले स्वागत मी डॉ. संजय देशपांडे आणि डॉ. सौ. रोहिणी देशपांडे या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहोत. मी सोलापुरात 1991 सालापासून आहोत. पहिले दहा वर्ष बनशंकरी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होतो. 2001 सालापासून रामकृष्ण हॉस्पिटल नव्याने उभारून येथे आम्ही कार्यरत आहोत. या हॉस्पिटल मध्ये OPD विभाग तळमजला मध्ये असून दोघांचे तपासणी विभाग, सोनोग्राफी, लॅबोरेटरी, एक्स-रे, ईसीजी व IUI ची सुविधा आहेत. आंतररुग्ण विभागामध्ये पहिला मजला मिळून पाच स्पेशल रूम व चार बेडचे दोन वार्ड आहेत. याशिवाय सुसज्ज ऑपरेशन थिएटर व लेबर रूम पहिल्या मजल्यावर आहेत. ऊर्जा अभावी जनरेटर आणि UPS ची सोय व लिफ्टची सोय आहे. अनुभवी (Staff) कर्मचारी आहेत. मेन रिसेप्शनिस्ट, तळमजल्यामध्ये OPD व कॅश काउंटरला स्टाफ आहेत. आंतररुग्ण विभागामध्ये सिस्टर्स व ऑपरेशन थिएटर असिस्टंट व आया आहेत. तसेच बाहेर 24 तास वॉचमन असतात. ऑपरेशन थिएटरमध्ये दुर्बिणीद्वारे सर्व ऑपरेशन साठी लागणारे सर्व व प्रकारचे मशीन्स आणि उपकरणे उपलब्ध आहेत. पूर्ण भूल देण्यासाठी मशिनरी आणि त्यांची सर्व उपकरणे व भूलतज्ञ डॉ. उपलब्ध आहेत.